शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते भावनिक

मुंबई- एम एन सी न्यूज नेटवर्क –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला.

आता शरद पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाशन झाले. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. अनेकांनी तिथेच घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सिल्व्हर ओकवर जाऊन अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शरद पवारांची मनधरणी केली. मात्र, तेव्हाही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. तसेच कार्यकर्त्यांनी विरोध मागे घ्यावा. राजीनामा सत्र थांबवावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत आपण फेरविचार करू, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नेते भाऊक झाले. जयंत पाटील यांना आपले अश्रू अनावर झाले,आपल्या भावना व्यक्त करने अवघड झाले होते.
शरद पवार यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते भावनिक