म. गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर : एम एन सी न्यूज नेटवर्क- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी (८९) यांचे मंगळवार, २ मे रोजी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जन्मलेले अरुण गांधी, हे गांधी विचारावर आधारित उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत होते. गेले दोन महिने गांधी हे कोल्हापुरातील वाशी पिरवाडी येथील अवनी संस्थेत वास्तव्यास होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापुरातील वाशी परिसरातील नंदवाळ येथे महात्मा गांधी फाऊंडेशनच्या जागेत मंगळवारी सायंकाळी गांधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त व गांधी यांचे सुपुत्र तुषार गांधी हे कोल्हापुरात आले असून त्यांनी अरुण गांधींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या वेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व कार्यकतें यांनी अरुण गांधी यांना अखेरचा निरोप दिला,