GoFirst एअर लाइन गुरुवारी 9 मेपर्यंत सर्व उड्डाणे निलंबित

विमान कंपनीने 15 मेपर्यंत फ्लाइट तिकिटांचे बुकिंगही बंद केले

दिल्ली – एम एन सी न्यूज नेटवर्क-नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA ने कठोर भूमिका दाखवत उड्डाणे रद्द झाल्यानंतर लगेचच प्रवाशांचे पैसे परत करण्यास सांगितले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या गो फर्स्ट (GoFirst) एअर लाइनने गुरुवारी 9 मेपर्यंत सर्व उड्डाणे निलंबित करण्याची घोषणा केली. विमान कंपनीने 15 मेपर्यंत फ्लाइट तिकिटांचे बुकिंगही बंद केले आहे. यापूर्वी सोमवारी GoFirst ने 3, 4 आणि 5 मे साठी उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली होती.उड्डाणे रद्द झाल्यानंतर लगेचच प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत करण्या चे सांगितले आहे. GoFirst च्या वेबसाइटनुसार, एअरलाइन 27 देशांतर्गत आणि 8 आंतरराष्ट्रीय स्थानांसाठी दररोज 200 पेक्षा जास्त फ्लाइट चालवत होती.

तिकिटाचे पैसे परत करणार गो फर्स्ट विमान कंपनीने तिकिटांचे पैसे परत करण्याचेही सांगितले आहे. प्रवाशांचे परतावा मूळ पेमेंट मोडद्वारे केला जाईल. म्हणजे, ज्यांनी तिकिटासाठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरले आहेत, त्यांच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये परतावा दिसून येईल. दुसरीकडे, ज्यांनी UPI आणि नेट बँकिंगद्वारे पैसे भरले आहेत त्यांना थेट त्यांच्या खात्यात परतावा मिळेल.NCLT आज ठरावाच्या कार्यवाहीवर करणार सुनावणी एअरलाइनने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) दिल्लीकडे ठराव प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला आहे. NCLT त्यावर आज म्हणजेच 4 मे रोजी सुनावणी करणार आहे.