सामत परिवार व सामत मित्रमंडळ; महाशिवरात्री निमीत्त उपवास फराळ वाटप

🔶  महाशिवरात्री निमीत्त 

बीड/परळी-वे. (प्रतिनीधी): परळी वैजनाथ येथे १२ ज्योर्तीलिंगा पैकी पंचम म्हणजेच पाचव्या क्रमांकाचे ज्योर्तीलिंग आहे. सदर ज्योर्तीलिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमीत्ताने महाराष्ट्र राज्य व देशाच्या इतर भागातून लाखो भावीक दर्शनासाठी येत असतात.

दि.१५.०२.२०२६ रोजी महाशिवरात्री निमीत्ताने परळी-वे. येथे येणारे भावीक भक्तांच्या सुविधेसाठी परळी-वे. येथील सामत परिवाराच्यावतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी राजगिरा फराळ लाडू वाटप करण्यात आले.

सामत परिवार सुरवातीपासून लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व. अशोकसेठ सामत साहेब यांचा सामाजीक कार्याचा वसा अग्रेसर राहून कार्य करत आहे. यानुसार त्यांचेवतीने परिवारातील सदस्य तथा मराठवाड्यातील अग्रगण्य बैंक दि वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँक लि., परळी-वै, चे चेअरमन मा. श्री विनोद अशोक सामत यांनी सहपरिवार, मित्र, यांचेसह राजगिरा लाडू वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून या सामाजीक कार्यक्रमास मोलाचा हातभार लावलेला आहे. सदर सेवेचा महाशिवरात्री निमीत्त उपस्थित भक्त परिवाराने बहुसंख्येने लाभ घेतला. यावेळी सामत परिवारातर्फे श्री. रूपेशशेठ सामत, श्री विनोदजी सामत, श्री राहुलजी सामत,श्री.हर्षवर्धन ,चि.कुणाल सामत,तसेच श्री नारायणजी सातपुते, श्री माऊली कांदे,श्री सुभाष मुंडे, श्री भगवान झुंजे, श्री राजाभाऊ काळे, श्री मोहन जोशी, श्री.अश्विन मोगरकर,श्री.चंद्रकांत उदगीरकर,श्री बालासाहेब गित्ते, श्री नारायण गर्जे, श्री मुकेश पाटील,श्री सुरेश घोणे, श्री हरिश नाथाणी व समस्त सामत मित्रमंडळ व परिसरातील नागरीक, व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते.

http://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2026/02/IMG-20260209-WA0004-1.jpg