आध्यात्मिक मूल्ये आणि सकारात्मक जीवनशैली अत्यंत महत्त्वाची –सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

🔶 परळी वैजनाथ येथे ब्रह्माकुमारीजच्या वतीने ‘स्नेह मिलन’ सोहळा ; नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

बीड/परळी वैजनाथ (प्रतिनिधी):  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ‘स्नेह मिलन’ या विशेष आध्यात्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षांनी राजयोग ध्यान, आध्यात्मिक मूल्ये आणि सकारात्मक जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतता, नैतिकता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रेरणादायी कार्यक्रमांची आज नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून माऊंट आबू येथील व्यापार आणि उद्योग प्रभाग मुख्यालय-संयोजिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी गीता दीदी जी उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासावर अनमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्नेहपूर्ण वातावरणामुळे उपस्थितांना एक नवी आत्मिक ऊर्जा व प्रेरणा लाभली.

कार्यक्रमाला हिंडौन सिटीच्या संचालिका राजयोगिनी ब्र.कु. हेतल दीदी, माऊंट आबू येथील मोटिवेशनल स्पीकर राजयोगी ब्र.कु. राजसिंह भाई, डॉ. अरुण गुट्टे आणि अल्ट्राटेक सिमेंटचे वरिष्ठ सरव्यवस्थापक प्रकाश सिंह हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंचवटी नगर येथील ब्रह्माकुमारीज केंद्रात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्यावतीने परिश्रम घेतले कार्यक्रमास ब्रह्मकुमारी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://maharashtranewsconnect.com/wp-content/uploads/2026/02/IMG-20260209-WA0004-1.jpg