🔷 ब्रिस्टल शिष्यवृत्ती
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल मुंबई कॅम्पस प्रायव्हेट लिमिटेड (UoB-M) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या कराराअंतर्गत ‘Chief Minister and University of Bristol Scholarship Scheme’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क माफीसह शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
सामंजस्य कराराची प्रमुख वैशिष्ट्ये:
🔺विद्यार्थ्यांच्या आर्थिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीची अट न ठेवता दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
🔺 गुणवत्ता-आधारित शिष्यवृत्ती योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण पदवी अभ्यासक्रमासाठी 100% शिक्षण शुल्क माफी (UoB-M मार्फत).
🔺 मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शाळा व शैक्षणिक संस्थांशी समन्वय वाढवणे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, ब्रिस्टल विद्यापीठाच्या कुलगुरू व अध्यक्षा प्रोफेसर एव्हलिन वेल्च तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
◾










