मागील सुमारे वीस वर्षातील सर्वाधिक कमी उन्हाळा

दिल्ली – एम एन सी न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र शेजारील गुजरात कर्नाटक आंध्रा तमिळनाडू आधी राज्यात किंबहुना देशात उन्हाळा साधारणपणे मार्च ते १५ जूनपर्यंत असतो. मात्र यावेळी मार्च महिन्यातच पश्चिमेकडून येणारे वादळीवाऱ्यांचा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन देशभरात सुमारे ३७.६ मिमी पाऊस झाला. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले. तर, एप्रिलमध्ये अनेक पश्चिमी वादळांच्या प्रवेशामुळे वायव्य भारतात अनेक वेळा पाऊस झाला आणि तापमानात मोठी घट निर्माण झाली.यंदा एप्रिलमध्ये देशभरात ४१.४ मिमी पाऊस झाला, जो सरासरीपेक्षा (३९.३ मिमी) ५% जास्त होता. मध्य भारतात एप्रिलमध्ये साधारणपणे ९.२ मिमी पाऊस होतो. परंतु या वेळी ३० मिमी म्हणजे सरासरी जास्त पावसाची नोंद झाली.हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचे नियमित आगमन १ जूनला केरळमध्ये होण्याची शक्यता आहेच.

देशातील मान्सूनचा प्रवास केरळ पासून सुरु होऊन हळूहळू जुलैपर्यंत राजस्थान आणि उर्वरित भारतात पोहो पोहोचून पसरतो. तोपर्यंत उष्णता राहू शकते. तथापि, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात एखादे वादळ निर्माण झाले तर मान्सूनपूर्व पावसाचा काळ येऊ शकतो.

हवामान खात्याने ओडिशातील १८ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. मोचा ७ मे रोजी प. बंगाल व ओडिशात परिणाम दाखवेल. ८ व ९ मे रोजी त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

◾ मे मध्ये अत्यंत कडक ऊन की तापमानात घट 

१५ मेनंतर पारा वाढू शकतो. परंतु वायव्य भारतापासून ते मध्य भारतातील राज्यांत अनेक दिवसांपर्यंत उष्म्याच्या लाटेसारख्या घटना सामान्य उन्हाळ्यापेक्षा कमी होतील. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात किनारपट्टी, राजस्थान सीमेवरील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये उष्ण लाटेचे दिवस साधारण दिवसांपेक्षा जास्तही असू शकतात.

सरासरीपेक्षा उष्मा कमी झाल्याने मान्सूनचा एकूण शेतीवर काय परिणाम होणार हे येणाऱ्या काळातच कळेल

मान्सूनच्या पावसावर १५ ते १६ घटकांचा प्रभाव आणि नियंत्रण असते.केवळ भारतीय भूपृष्ठावरील तापमानाचा मान्सूनशी थेट संबंध नाही. यंदा साधारण मान्सूनचा पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.