संस्कार प्राथमिक शाळेत विद्यानगर विभागात श्री. छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी दिन साजरा

शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते.. दिपक तांदळे

परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क-संस्कार प्राथमिक शाळा विद्यानगर विभागात क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून समाजातील सर्व घटकांना न्याय, विकासाची संधी देणारे, शिक्षणाची दारं खुली करणारे थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानगर विभागाचे पर्यवेक्षक श्री. गायकवाड सर व प्रमुख पाहुणे पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. दिपकजी तांदळे साहेब यांची उपस्थिती होती. उ

पस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर दिपकजी तांदळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. असे प्रतिपादन केले.
यावेळी शाळेतील गुणपत्रक घेऊन जाण्यासाठी आलेले विद्यार्थी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.