फुले -शाहू – आंबेडकर चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने

परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क-फुले -शाहू -आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक- पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले. ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष जगदीश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरंडे ,व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार श्रीराम लांडगे, डिजिटल मीडिया तालुका सचिव दिपक गित्ते, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षअमोल सूर्यवंशी, धीरज जंगले, प्रा.दशरथ रोडे आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी धनंजय आरबुने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रभूमी ही फुले -शाहू -आंबेडकर आणि पुरोगामी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी निर्णय घेऊन विषमतावादी व्यवस्थेस आव्हान दिले . त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना शिक्षणासाठी वसतिगृह काढले, बालविवाह सतीप्रथा बंद केल्या तसेच त्यांच्या राज्यात जलनीतीवर प्रभावी अंमलबजावणी केली. अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्यांनी आपल्या जीवन काळात घेतले. स्मृती अभिवादनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी तर आभार नितीन ढाकणे यांनी मानले.या प्रसंगी पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.