कन्हेरवाडी येथे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या उपस्थितीत बौद्ध पौर्णिमा साजरी

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क-:-परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथे बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ दीपाताई मुधोळ /मुंडे यांचे हस्ते बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बौद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मा.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र पुस्तकाचे वाटप उपस्थितांना करण्यात आले.

तसेच कन्हेरवाडी ग्रामपंचायत प्रांगणात प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना तसेच शासकीय योजनेची माहिती देताना बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर रोडे यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे, कन्हेरवाडी सज्जा च्या तलाठी तुम्मेदवार मॅडम, एसबीआयचे बँकेचे मॅनेजर, तसेच प्रशासकीय अधिकारी, मौजे कन्हेरवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती अध्यक्ष महादेव रोडे, अमोल रोडे, वैभव रोडे, नितीन रोडे, कोषाध्यक्ष सचिन लांडगे, मेघराज रोडे, सचिव प्रशांत रोडे आदींची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमास गंगाधर अप्पा रोडे, प्रभाकर रोडे, राहूल रोडे, अमोल रोडे, देवानंद आलट, सिद्धोधन प्रधान, श्रीराम हनवते, बाबासाहेब रोडे, रोहन रोड, प्रदीप रोडे, योगाधन रोडे, बालाजी रोडे, सोमनाथ रोडे, बंटी रोडे, विकी हनवते,अशोक गवळी, विष्णु कांबळे, अजीत रोडे, नितीन शिंदे, दत्ता सावंत, विनीत रोडे, प्रदीप रोडे, प्रकाश रोडे, गौतम रोडे आदिसह कनेरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल रोडे ग्रा. प.सदस्य यांनी केले.