बंसल क्लासेस आयोजित “एका लग्नाची पुढची गोष्ट” नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद

बंसल क्लासेसच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क- :बंसल क्लासेस सातत्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभिनव उपक्रमांची उभारणी करण्यात यशस्वी होते. गत वर्षीप्रमाणे याहीवर्षी बंसल क्लासेसच्या आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कौतुक सोहळ्यासाठी बंसल क्लासेस अनेक पदाधिकारी, मान्यवर तथा पालकांची उपस्थिती होती. याचबरोबर दि. 4 में रोजी सायं 7.00 वाजता वैष्णव पॅंलेस एमआयडीसी विप्र नगर बीड येथे पालक आणि बीडकरांसाठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या सुप्रसिद्ध एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या मोफत प्रयोगाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

बंसल क्लासेसच्या वतीने बीडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन करण्यात आले होते. बंसल क्लासेसच्या अहवानाला साद घालत बीडवासीय हजारों हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते प्रशांत दामले कविता मेढेकर यांच्या अभिनयाने सजलेले एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने अवघा महाराष्ट्र गाजवला पण याबरोबरच काल अभिनेते प्रशांत दामले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्या अभिनय कौशल्याने बीडकरांची मने जिंकली. हे नाटक बीडवासियांसाठी खास मेजवानी ठरले. बंसल क्लासेसच्या उपक्रमासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा बीडच्या अध्यक्षा डॉ. दिपाताई क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे, बंसल क्लासेस महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ.रामेश्वर बांगड व प्रा.कैलास घुगे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, पत्रकार मान्यवरांची सह परिवार प्रमुख उपस्थिती होती.बंसल क्लासेसच्या आवाहनास साद घालून उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांचे आभार बंसल क्लासेसचे बीडचे शाखा प्रमुख पांडुरंग कळकेकर पाटील यांनी केले.