पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने द केरळ स्टोरी चित्रपटावर घातली बंदी

मुंबई – द केरळ स्टोरी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला असला तरी पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे येते आहे. पश्चिम बंगाल मध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घातल्याच्या संदर्भात माध्यमांशी बोलताना चित्रपटाचे निर्माते विपुल शाह म्हणाले की ममता बॅनर्जी यांची नेमकी अडचण समजत नाहीये, त्यासाठी त्यांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. आम्ही कायद्याच्या तरतुदीनुसार जे काही शक्य आहे ते आम्ही करू.तर या बंदी मुळे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ममता या इसिस मॉडेलचं सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मतदारांना खुश करण्याच्या राजकारणी लालसे पायी त्या दहशतवादी संघटनेची पाठराखन करत त्यांच्या विचाराला वाढवण्याचे काम करत चित्रपटावर बंदी आणत आहेत. अशा कारणामुळे देशभरातील मुलींचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे ते म्हणाले.

ममता बॅनर्जी यांच्या मतें राज्यात शांतता अबाधित राहण्यासाठी आणि द्वेष व हिंसाचार होऊ नये यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.