ऊस तोडणी मजुराचा कॅन्सर मुळे मृत्यू .ॲड.माधव जाधव यांनी मुलाच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

परळी वैजनाथ: परळी विधानसभा मतदारसंघातील कासारवाडी ता.परळी वैजनाथ येथील ऊस तोडणी मजूर दिलीपराव शिंदे यांचा कर्नाटक येथे कारखान्याला ऊस तोडणी साठी जात असताना कॅन्सर मुळे दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे त्यांची पत्नी व मुलगा यांचे कुटुंबाचे छत्र हरवले. दिलीप शिंदे यांची पत्नी मोल मजुरी करून मुलगा माऊली दिलीप शिंदे इयत्ता आठवी याचे व स्वतःचे कसेबसे पालन पोषण करत आहेत.परंतु त्यामध्ये दोघांची उपासमार होत आहे.कारण त्यांच्या कुटुंबाला इतर उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.मजुरी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

ही बाब मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी कासारवाडी येथे जाऊन मयत ऊस तोडणी मजूर दिलीपराव शिंदे यांचे घरी भेट देऊन त्या कुटुंबाचे सांत्वन केले व तसेच इयत्ता आठवी मध्ये शिकणारा लहान मुलगा माऊली दिलीप शिंदे यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ॲड. माधव जाधव यांनी घेतली.तसेच माऊली शिंदे ही मुलगा अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी आला तर त्याची संपूर्ण राहण्याची जेवणाची व शिक्षणाची जबाबदारी ॲड माधव जाधव यांनी घेतलेली आहे.ॲड माधव जाधव यांचे सोबत अनिरुद्ध बापू अंभोरे, धर्मराज सोळंके सर ,राम किर्दंत, भारतराव पौळ पाटील, उपसरपंच भगवानराव पौळ ,जगमित्र पौळ,दिनकर पौळ ,राम सोळंके नागापूरकर,बाळासाहेब पाथरकर,गजानन आंबोरे,भारत आंबोरे,कारभारी शिंदे,माणिकराव शिंदे, वैजनाथराव थावरे, ज्ञानेश्वर आंबोरे व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.