छत्रपती संभाजीनगर एम एन सी न्यूज नेटवर्क : दि. 11 मे 2023 रोजी बंसल क्लासेस महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक, राजस्थानी मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा क्यूरिअस किड्स महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक मा. श्री. चंदुलालजी बियाणी सर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यामध्ये बंसल क्लासेसच्या 34 पेक्षा जास्त शाखांनी वेगवेगळ्या शहरात अन्नदान, फळ वाटप, पाणी वाटप इ. सामाजिक उपक्रम राबविले. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जय भगवान अनाथ आश्रम येथे बंसल क्लासेस महाराष्ट्राचे स्टेट हेड मा. श्री. विष्णू घुगे सर यांच्या पुढाकाराने अनाथ चिमुकल्यांना अन्नदान व फळ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे गेवराई येथे मा. श्री. गोविंदजी सारडा यांच्या नियोजनात सहारा अनाथालय परिवार (बालग्राम) या ठिकाणी अन्नदान करण्यात आले. उद्गीर, परभणी शाखेतर्फे जिल्हा व उपजिल्हा सामान्य रूग्णालय या ठिकाणी रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. अहमदनगर शाखेकडून देखील गरजूंना फळ वाटप करण्यात आले. अशा प्रकारे बंसल क्लासेसच्या 34 पेक्षा जास्त शाखांनी महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये सामाजिक उपक्रम जोपासत मा. चंदुलालजी बियाणी यांचा वाढदिवस साजरा केला. मा. श्री. चंदुलालजी बियाणी यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मीक, राजकीय, वित्त, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपली सेवा देऊन अनेक लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत व सहकार्य केलेले आहे.
बंसल क्लासेसच्या माध्यमातून मा. श्री. चंदुलालजी बियाणी सर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शैक्षणिक सेवेचे कार्य पोहोचविले आहे. शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज, बंसल शिक्षा समृद्धी अभियानाच्या माध्यमातून इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, बंसल लाईव्ह या डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट व जेईईची तयारी करण्यासाठी प्रति विषय प्रति दिवस 1 रूपया या नाममात्र दरात शिक्षणाची सुविधा बियाणी सरांनी उपलब्ध करून दिली आहे. बियाणी सर यांनी आपले वडील पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी (काकाजी) यांच्या नावे अनेक शहरांमध्ये गरजवंतांसाठी मोफत अन्नछत्र देखील सुरू केलेले आहे. सर राजकीय, सामाजिक, धार्मीक व शैक्षणिक माध्यमातून सातत्याने समाजाला सेवा पुरवत आहेत.
