अकोला सर्वाधिक तापमान 

अकोला- राज्यात सर्वाधिक तापमान म्हणून अकोला शहराची नोंद झाली असून मात्र मागील वर्षा सारखी स्थिती अकोल्याची दिसून येत आहे मे महिन्यात अकोल्याचे तापमान गेल्या वर्षी आणि यावर्षी जवळपास समान असल्याचे दिसून येत आहे.

एकूणच राज्यात उन्हाचा दाह वाढला आहे. मे महिन्यातच गत काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे उष्णता घटली होती. कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी वादळी वारे, यामुळे उन्हाळ्यातही पावसाळा आहे की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता उन्हाचे चटके जास्त जाणवत आहेत. तापमान वाढीमुळे दिवसा बाहेर पडणं कठीण झाले. रस्त्यावरील वर्दळ कमी झाली.सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाचा पारा 42 पेक्षा अधिक किंवा जवळपास असल्याचे दिसून येत आहे.

अचानक तापमानात एवढी वाढ होण्यामागचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात होणारे बदल. गत काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात मोचा वादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याचा हवामान विभागाचा निष्कर्ष आहे.

मागील सुमारे पाच-सहा दिवसात नागपूर विभागातील विविध शहरात तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. अकोला ४४.५ अमरावती ४२.६ बुलढाणा ४०.६ ब्रम्हपुरी ४१.२ चंद्रपूर ४१.६, गडचिरोली ४०.० , गोंदिया ४२.५, नागपूर ४२.०, वर्धा ४३.०, वाशीम ४०.० , यवतमाळ ४२.०, तर मराठवाड्यात औरंगाबाद सुमारे 42.0 बीड 41.5 नांदेड 41.0