परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क- सुट्यामध्ये शेतात इकडे तिकडे फिरणे आंबे,चिंचा,खाणे विविध प्रकारचे खेळ खेळणे कबड्डी, गोट्या मित्रांसोबत खेळणे अशा प्रकारची मौजमजा करण्यात मजा येते.
आजच्या काळातील युवा पिढी मोबाईल, सोशलमिडीया, काँम्प्युटर, व्हिडीओ गेम्सच्या आहारी गेलेली आहे. मैदानी खेळ कमी झाले आहेत. यामधून युवा पिढीला मैदानी खेळात आवड निर्माण व्हावी, युवक व्यसनापासून दुर व्हावेेत. निरोगी व सशक्त बनावे यासाठी शहरात मागील ३१ वर्षांपासून हनुमान व्यायाम शाळा व वैद्यनाथ बँकेच्या वतीनेे उन्हाळी व्यायाम व संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे शिबीर १८ एप्रिल ते २१ मे दरम्यान वैैैद्यनाथ मंदीरासमोरील मैदानावर आयोजित केले आहे. या शिबिरात मल्लखांब, रोपमल्लखांब, कुस्ती, लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा, कराटे, योगासने, प्राणायाम, बाक्सिंग, मानवी मनोरे, रोपक्लायमिंग, तलवारबाजी, मार्चपास, पोहणे, श्लोक पाठांतर व ध्यानधारणा आदि, खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून शाळकरी मुलांचे शारीरिक, बौद्धिक विकास साधण्याचे व मुुलांना व्यायामाची आवड या माध्यमातून निर्माण केली जाते. या शिबीरास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असतो. दरवर्षी जवळपास चारशे ते पाचशे विद्यार्थी या शिबिरात सहभागी होत आहेत.
आजपर्यंत हजारो विद्यार्थी या शिबीरात प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. नऊ ते चौदा वर्षेे वयोगटातील हे सर्व विद्यार्थ्यी यांना या शिबीराच्या माध्यमातून विसरत चाललेले व्यायाम प्रकार, संस्कार मिळत आहेत. यावर्षी ही शिबीरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळ जवळ चारशेच्यावर विद्यार्थी मुले, मुली या शिबिरात सहभागी झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिबीरामध्ये जेवढे काही खेळ घेतले जातात ते शिकवणारे शिक्षक कसल्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. सकाळी पहाटे पाच ते आठ व संध्याकाळी पाच ते आठ यावेळेत हे शिबीर घेतले जाते.
शिबीरात या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रोज सकाळी आठ वाजता खिचडी, काजू, बदाम, खारीक, खडीसाखर, टमाटे, केळी, उपमा, चने,मटकी सारखा पौष्टिक आहार ही संयोजकाच्या वतीने दिला जातो. शिबिरासाठी स्वतंत्र युनिफॉर्म दिला जातो. शिबीराच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडले ते आज भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. या शिबीरामुळे किमान एक महिनातरी विद्यार्थी मैदानावर येतो हेे या शिबीराचे यश आहे. शहरातील विद्यार्थी आपल्या परिक्षा संंपल्यानंतर या शिबीराची वाट पाहत असतात. ऐवढी आवड या शिबीराची विद्यार्थ्यांना आहे. सुट्या असूनही मुले-मुली मोबाईल पासून दूर राहत आहेत.व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके, सचिव देविदास कावरे, शिबीर प्रमुख सुभाष नानेकर, क्रिडा शिक्षक अमर देशमुख, प्रा. अतुल दुबे, विजय मुंडे, प्रा.डॉ जगदीश कावरे,विलास आरगडे, बालासाहेब हंगरगे, योगा शिक्षक बालासाहेब कराड, महादेव फड, अँड सायस मुंडे, महिला प्रशिक्षक, प्रा.विरश्री आर्या यांच्यासह २५ शिक्षक प्रशिक्षण देत आहेत.

