मराठी पत्रकार परिषद शाखा परळीची महत्त्वपूर्ण बैठक परळी

परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क:- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने आज दिनांक 14 मे 2023 रोजी साथी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शहर व तालुक्यातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वय धनंजय आरबुने, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे,डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे शहराध्यक्ष अभिमन्यू फड तालुका सचिव दीपक गिते आदींनी केले आहे.

आगामी जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी जिल्हा दौरा करणार आहेत. हा दौरा शनिवार ते सोमवार असा राहणार आहे. यात शनिवार दि. 13 मे रोजी सकाळी 9 वा. वडवणी, सकाळी 11 वा. माजलगाव, दुपारी 2 वा. गेवराई, *रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 10 वा. परळी,* दुपारी 12 वाजता अंबाजोगाई, दुपारी 2 वाजता केज, दुपारी 4 वा. धारूर, येथे बैठक होईल. दि 15 रोजी सकाळी 9 वाजता पाटोदा, दुपारी 12 वा. आष्टी, तर दुपारी 5 वा. शिरूर येथे बैठक होईल. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळी वैजनाथ ची बैठक मराठवाडा साथी सभागृह येथे संपन्न होणार आहे. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असून अधिवेशना संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस सर्व सन्माननीय सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहमराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वय धनंजय आरबुने, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे,डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे, शहराध्यक्ष अभिमन्यू फड, तालुका सचिव दीपक गिते आदींनी केले आहे.