स्वाभिमान,शौर्य यांचा सुयोग्य मिलाप साधून शिवनिती छत्रपती संभाजी महाराजांनी चालविली-वैजनाथ माने

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

परळी- वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क– –  छत्रपती संभाजी महाराज यांना केवळ 32 वर्षाचा आयुष्य मिळालं त्यातही अखंड संघर्ष. माँसाहेब जिजाऊंच्या कुशीत बालपणीच पराक्रमाचे धडे घेत आपल्या संबंध आयुष्यामध्ये क्षणोक्षणी पराक्रम,स्वाभिमान,शौर्य यांचा सुयोग्य मिलाप साधून शिवनिती छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालविली. कधीही अस्त न होणाऱ्या इतिहासाचा उदय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन कल्याणकारी आणि नवनिर्माणाच्या निखाऱ्यांनी पेटलेलं धगधगतं अग्नीकुंड म्हणजे संभाजी महाराजांचं चरित्र. आयुष्यभर निर्व्यसनी राहुन जिद्द जाज्वल्यवृत्ती, चिकाटी, मेहनत, हिम्मत अशा अनेक पैलूद्वारे राष्ट्रनिर्मिती करुन राष्ट्रासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज आजच्या युवकांचे स्फूर्तीस्थान-प्रेरणास्थान आहेत. असे प्रतिपादन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी केले. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात दिनांक 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे परळी तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर व तालुक्यात ठीक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.परळी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे परळी शहर प्रमुख वैजनाथ माने, शिवसेना शहर संघटक सचिन सोनवणे,शहर उपाध्यक्ष अॅङ संजय डिगोळे, शहर उपप्रमुख बाळासाहेब युवासेना शहर प्रमुख गजानन कोकीळ, जेष्ठ शिवसैनिक नारायण दादा पांचाळ, विभाग प्रमुख विठल गायकवाड, अतिष दहातोंडे, अनिकेत माने शिवाजी पुरी, नागेश माळी, अजय लांडगे, नारायण आदाटे आधी सह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.