आर्यन खान ड्रग्स प्रकरण, समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा.

मुंबई- आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये समीर वानखेडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदार के.पी. गोसावी याचा आर्यन खानच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न होता, असंही सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हणलं आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी  प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. हे फक्त आरोप आहोत, आम्ही सीबीआयच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे सहकार्य करत आहोत. आमचा कायद्यावर विश्वास आहे, सजक नागरिक म्हणून आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी तयार आहोत,’ असं क्रांती रेडकर म्हणाली आहे.

आर्यन खान प्रकरणामध्ये सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरासह अनेक जागी छापे टाकले. सीबीआयच्या छापेमारीमध्ये वानखेडे यांच्या घरातून काही हजार रुपये सापडल्याची माहिती समोर आली आहे. आपण कायदा मानणारे असून कारवाईला सामोरं जायला तयार आहोत.