पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव एसटी बसची दोन चाके निखळल्याची धक्कादायक घटना

सुमारे 35 प्रवासी प्रवासी बालम बाल बचावले

पुणे एम एन सी न्यूज नेटवर्क- पुणे -नाशिक महामार्गावर शेवाळवाडी येथें (तालुका आंबेगाव)  धावत्या बसची मागची दोन्ही चाके निखळली. या अपघातात चालकाच्या प्रसंग सावधानामुळे सुमारे 35 प्रवासी प्रवासी बालम बाल बचावले. हा अपघात पुणे – नाशिक महामार्गावरील जुन्नर जवळील आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी येथे महामार्गावर वेगात जाणाऱ्या बसची चाकं धावतानाच प्रवासातच निखळली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवाशी नशीब बलवत्तर म्हणून थोड्क्यात बचावले आहेत.  बस क्रमांक MH20-BL 3618 ही गाडी मुंबईतील परळवरुन पुण्यातील नारायणगावकडे निघाली होती. एसटीत जवळपास 35 प्रवासी होते.

चालकाचे प्रसंगावधान  महत्वपूर्ण

पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीत ही घटना घडली. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. महामार्गावर बस धावत असतानाच बसची मागची दोन्ही चाके निखळली होती. त्यानंतर काही वेळ बस तीन चाकांवर धावत होती. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस अलगद रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

चाके गळून गेल्याने खालचा भाग रस्त्यावर घासला,

बसचे चाके निखळल्यानंतर बस रस्त्यावरच तिरपी धावत होती. या दरम्यान बसचा खालचा भाग रस्त्यावर घासला गेला. त्यामुळे मोठ्या ठिणग्या उडाल्या. अचानक ही घटना घडल्याने बसमधील प्रवासीही घाबरले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. मात्र, यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.