छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव या मार्गावर महाराष्ट्रराज्या साठी आणखी एक वंदे भारत ट्रेनची भर

चाचणी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पहाटे 5.50 मिनिटांनी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 12.50 मिनिटांनी गोव्यातील मडगाव स्थानकावर अवघ्या सात तासात पोहोचली. 

मुंबई – नुकतेच मुंबई गोवा मार्गावर वंदे भारत ट्रेन असून रेल्वे प्रशासनाने मंगळवार दिनांक 16 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते मडगाव गोवा या मार्गावर सध्या सर्वात सुपरफास्ट असणारी वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली चाचणी दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी रवाना झाली तर मडगाव येथे ही गाडी अवघ्या सात तासात पोहोचली सुमारे 12:50 वाजता मडगाव येथे पोहोचली ची माहिती कोकण रेल्वेचे वतीने देण्यात आली आहे.
सर्वसाधारणपणे आता धावत असणाऱ्या गाड्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव येथे पोहोचायला सुमारे  तास लागतात, मात्र सेमी हायस्पीड अशा वंदे भारत ट्रेन ने चाचणी दरम्यान अवघ्या सात तासात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी ते मडगाव हे अंतर पार केले. त्यामुळे भविष्यात या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुमारे दोन तास इतका वेळ वाचणार आहे.

सर्व सुविधायुक्त, आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान प्रवास नागरिकांना मिळावा या दृष्टीने भारतीय रेल्वे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असून वंदे भारत ट्रेन सारख्या हायस्पीड ट्रेनमुळे वेळेची मोठी बचत होताना दिसून येत आहे. सद्यस्थितीत देशातील विविध राज्यातील 14 मार्गावर अत्याधुनिक अशा हाय स्पीड रेल्वे अर्थातच वंदे भारत धावताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव या मार्गावर महाराष्ट्रराज्या साठी आणखी एक वंदे भारत ट्रेनची भर पडत असून ही नवी ट्रेन मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे.

16 तारखेला झालेल्या चाचणी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून पहाटे ५.५० मिनिटांनी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 12.50  मिनिटांनी गोव्यातील मडगाव स्थानकावर पोहोचली. तर तिच्या परतीच्या प्रवासात दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी ही गाडी मडगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी रवाना झाली. मुंबईमध्ये ती रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोचली. या गाडीनं अवघ्या 7 तासात हे अंतर पार केल्यामुळे मुंबई तें गोव्या नियमितपणे जाणाऱ्या किंबहुना कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमानांमध्ये या रेल्वे विषयी मोठी उत्सुकता दिसून येत आहे.आणखी चाचणीच्या काही फेऱ्या झाल्यानंतर वेग आणि रेल्वे ट्रॅक बाबतींत तांत्रिक बाबीही समोर येतील. येत्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव गाडी धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.