हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन

◾चार हिंदुजा भावंडांन मध्ये एसपी हिंदुजा हे सर्वात मोठे होते.

लंडन-हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा म्हणजेच एसपी हिंदुजा (वय ८७ ) निधन झाले असून गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. चार हिंदुजा भावंडांन मध्ये एसपी हिंदुजा हे सर्वात मोठे होते. लंडन येथे त्यांचे निधन झाले.
एसपी हिंदुजा यांना सानू आणि वीणू या दोन मुली आहेत. 1952 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर, एसपी हिंदुजा आपल्या वडिलांच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले.

हिंदुजा परिवाराने दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे की, ‘आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. ते कुटुंबाचे गुरू होते. त्यांचा यजमान देश यूके आणि त्यांचा मूळ देश भारत यांच्यात मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी आपल्या भावांसोबत खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

हिंदुजा समूह ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. हिंदुजा समूह हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. 1971 मध्ये परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी कौटुंबिक वारसा हाती घेतला. हिंदुजा परिवाराच्या अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडसइंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स लिमिटेड या त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत.

फोर्ब्सच्या मते, डिसेंबर 2022 मध्ये हिंदुजा ब्रदर्सची एकूण संपत्ती 15.2 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 1.2 लाख कोटी रुपये होती.