दिल्ली- बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने बंगाल सरकारला चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचे ऐकण्याआधी आम्हालाही हा चित्रपट बघायला आवडेल.
न्यायालयाने म्हटले आहे की, ‘या चित्रपटात 32 हजार महिलांनी इस्लाम स्वीकारल्याच्या आरोपांवर डिस्क्लेमर टाकला जावा आणि निर्मात्याने 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपूर्वी हे काम करावे. जनतेच्या असहिष्णुतेला महत्त्व देऊन कायद्याचा असाच वापर केला तर प्रत्येक चित्रपटाची अशीच अवस्था होईल. कायदा व सुव्यवस्था राखणे हे राज्याचे कर्तव्य आहे.
द केरळ स्टोरी हा केरळमधील महिलांच्या एका गटाबद्दलचा चित्रपट आहे जो इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये सामील होतो. CBFC ने रिलीजपूर्वी चित्रपटात 14 कट्स लावले होते.