भारतीय रिझर्व बँक 2000 च्या नोटा चलनातून मागें घेणारं.

23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकेत जमा किंवा बदलून घ्याव्या लागतील. एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील.

काही जाणकारांच्या मते विविध विभागाच्या जसे आयकर एडी छाप्यां मध्ये, जप्त करण्यात आलेला 95% पेक्षा बेहिशोबी पैसा 500 आणि 2000 च्या नोटांमध्ये होता. त्यामुळे रुपये 2000 च्या नोटा मागे घेण्यात येत आहेत.

दिल्ली- रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय)  रिझर्व्ह बँक सध्या अस्तित्वात असलेल्या रुपये 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. आरबीआयने 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांना या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका वेळी केवळ 20,000 रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील. तर बँका आतापासूनच रु. 2000 ची नोट आपल्या ग्राहकांना देनार नाही. आरबीआयने म्हटले की 2018-19 मध्ये त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्यांची छपाई थांबवण्यात आली होती.

RBI ने आपल्या परिपत्रकात 2000 च्या नोटा चलनातून मागे घेत असल्याचे लिहिले आहे. यासाठी कोणतीही तारीख किंवा वेळ दिलेली नाही. म्हणजेच हा निर्णय तत्काळ लागू झाला आहे.निर्णयाची अंमलबजावणी उद्या पासून होत आहे असेचं समजावे लागेल.

◾नोट बदलण्यासाठी पूर्वी च्या नोट बंदी सारखेच बँकेत जाऊन या नोटा बदलता येतील. त्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नोटा बदलताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी बँकांनाही याबाबत कळवण्यात आले आहे.

◾ रुपये 2000 च्या नोटा चलनातून मागे घेतल्यामुळे नोटांद्वारे खरेदीवर बाजारात मोठा परिणाम दिसेल. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर साठवल्या मूळे रोजच्या व्यवहारात दिसतं नाहीत. त्या चलनात ठेवल्या असल्या तरी नागरिक ,व्यापारी त्याद्वारे व्यवहार करण्यास कचरतील. अशा स्थितीत त्या बँकेतूनच बदलून घेणे योग्य ठरेल.

◾आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.तारीख वाढू शकते परंतु सामान्य नागरिकांना
शेवटच्या तारखेची वाट पहाणे धोकादायक ठरू शकते. दरम्यान जर सरकारने त्यानंतर नोटा अवैध ठरवल्या तर तुमच्याकडे असलेल्या रुपये 2000 च्या नोटांची किंमत उरणार नाही. नोटा बदलण्यासाठी ची मोठी गर्दी लांबच लांब रांगा त्यामुळे ही मनस्ताप होऊ शकतो

रुपये 2000 ची नोट चलनातून मागे घेणे हा निर्णय सर्वांसाठी लागू आहे. 2000 च्या नोटा ज्यांच्याकडे आहे त्या प्रत्येक व्यक्तीला 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकेत जमा किंवा बदलून घ्याव्या लागतील. एकावेळी फक्त 10 नोटा म्हणजेच जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील.

◾भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) 2016-17 ते 2021-22 पर्यंतचे वार्षिक अहवाल दाखवतात की RBI 2016 पासून 500 आणि 2000 च्या एकूण 6,849 कोटी चलनी नोटा छापल्या आहेत. त्यापैकी 1,680 कोटींहून अधिक चलनी नोटा चलनातून गायब आहेत. या गहाळ नोटांची किंमत 9.21 लाख कोटी रुपये आहे. या हरवलेल्या नोटांमध्ये त्या नोटांचा समावेश नाही ज्या खराब झाल्यानंतर आरबीआयने नष्ट केल्या होत्या.

आर्थिक बाबीशी संबंधित अधिका-यांचे मत आहे की काळा पैसा जमा करण्यासाठी सर्वात जास्त वापर मोठ्या मूल्यांच्या म्हणजेच 500 आ 2000 च्या नोटांचा होतो. कदाचित याच कारणामुळे 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई थांबली आहे. पण 2016 च्या तुलनेत 500 च्या नवीन डिझाईनच्या नोटांच्या छपाईत 76% वाढ झाली आहे.