जल पुनर्भरणा साठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ सरसावल्या

बीड- एम एन सी न्यूज नेटवर्क– बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी जल पुनर्भरणाबाबत केलेल्या घोषणे बरोबरच त्या दिशेने पाऊल ही उचलले आहे. भविष्यातील संभाव्य अल्पप्रजन्य काळ व त्यामुळे येणारं पाण्याचं संकट लक्षात घेवून त्यांनी जल आणि विहीरींच्या पुनर्भरणावर अधिक भर दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाची सामना करण्यासाठी एक एक थेंब पाणी साठवण गरजेच आहे या कामासाठी आता त्या सरसावल्या असून शुक्रवारी त्यांनी स्वत: काकडहिरा येथे जावून विहीर पुनर्भरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली.

येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, याअनुषंगानेच बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या अत्यंत काळजीपूर्वक पावसाच्या पाण्याचे नियोजनाबाबत विचार करताना दिसून येत आहेत. येत्या काळात जिल्ह्यात पाण्याचे संकट भासू नये यासाठी त्यांनी जल पुनर्भरणावर अधिक भर दिला आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे असून भूजल किंबहुना विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी पुनर्भरण आवश्यक आहे. या अनुषंगानेच त्यांनी महसूल, कृषी आणि झेडपीची यंत्रणा कामाला लावलेली आहे, विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पुनर्भरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवातही केली आहे. शुक्रवारी त्यांच्या हस्ते बीड तालुक्यातील काकडहिरा याठिकाणी विहीर पुनर्भरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या विहीरींचे पुनर्भरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदित्य जीवने, उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील, नरेगाचे गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप आदी सह ईतर अनेक अधीकारी उपस्थित होते.