परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क- महाविकास आघाडीचे नेते खा.संजय राऊत हे महाप्रबोधन याञे निमित्ताने परळी शहरात आले असता परळी शहर काँग्रेसच्या वतिने शहर काँग्रेस कार्यालय येथे शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडी व उध्दव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत हे बीड येथे होणाऱ्या महाप्रबोधन याञेसाठी जात असतांना शनिवारी परळीत आले होते.
परळी शहर काँग्रेस आयच्या वतिने शहर काँग्रेस कार्यालयात सत्कारांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी शाल फेटा बांधुन स्वागत सत्कार केला.या प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ नेते माजी शहर अध्यक्ष प्रकाश देशमुख, गुलाबराव देशमुख, समंदर खान,गाडेकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मुंडे , कार्याध्यक्ष शशी चौधरी,उपाध्यक्ष सुभाष देशमुख,सरचिटणीस शिवाजी देशमुख प्रवक्ते बद्दर भाई, युवक प्रदेश चिटणीस नितीन हत्तिंबरे ,युवक विधानसभा अध्यक्ष रणजित देशमुख,अनुसूची जाती जमाती अध्येक्ष दीपक शिरसाट,ओबीसी अध्यक्ष जावेद भाई,अल्पसंख्याक अध्यक्ष शेख सद्दाम,कार्याध्यक्ष रसूल खान,अलीम भाई,अमजद भाई,अबुताला अदी काँग्रेस आय आघाडीचे सर्व प्रमुख उपस्थित होते.