वातावरणात मोठा बदल कुठे मुसळधार तर कुठे तापमान 45 अंशाच्या वर.

हवामान
🔷 मध्यप्रदेशात,राजस्थान पाऊस  तर कर्नाटक मध्ये वादळी वारे बेंगलोर मध्ये मुसळधार पाऊस

दिल्ली- देशभरातील वातावरणात मोठा बदल दिसून येत असून काही ठिकाणी 45 अंश सेल्सिअस तापमान तर काही भागात मुसळधार आणि वादळी वाऱ्या ची हजेरी दिसून आली. रविवारी देशातील अनेक भागात हवामानात बदल झाला. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. त्याच वेळी, उत्तरप्रदेश च्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले. येथे हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

ओडिशाच्या भद्रकमध्ये वादळी जोरदार हवे मुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. रेल्वेच्या ओव्हरहेड वायर तुटून वंदे भारत ट्रेनवर पडल्या. सदरील घटना दुखापट्टणा-मंजुरी रोड स्थानकादरम्यानच्या वैतरणी पुलावर रविवारी दुपारी 4.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. वायर तुटल्याने वंदे भारत एक्सप्रेस खो खोळंबली.

बेंगळुरू, कर्नाटकात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात एक कार अडकली. त्यात आंध्र प्रदेशातील एक कुटुंब होते. लोकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली, मात्र 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.यूपीमध्ये आता उन्हाळ्याचा तडाखा वाढू लागला आहे. शनिवारी झांशी राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथील पारा 45.1 अंश सेल्सिअस नोंदवला गेला, जो या हंगामातील सर्वोच्च आहे. त्याच वेळी, राज्यातील 75 पैकी 26 जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवला गेला. येत्या 48 तासांत म्हणजे सोमवारपर्यंत तीव्र उष्मा राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. छत्तीसगडमध्ये तीव्र उष्णता पाहायला मिळत आहे. दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रविवारी 45 अंश तापमानासह शक्ती जिल्हा सर्वात उष्ण ठरला.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 24 मेपर्यंत तापमानात वाढ होत राहील, त्यानंतर त्यात घट होईल. 20 ते 22 मे दरम्यान उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 3 दिवसात वायव्य भारतात कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसने वाढण्याची आणि घसरण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांत मध्य भारतातील तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.

पुढील काही दिवस • आसाम आणि मेघालयात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.• उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ / धूळ उडण्याची शक्यता आहे.• 22 मे पर्यंत राजस्थानमध्ये उष्णता खूप वाढणार आहे. उष्णतेची लाट कायम राहणार आहे.• 23 मे पासून राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.• 22 मे रोजी मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

◾केरळमधील 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे येलो अलर्ट IMD ने केरळच्या सहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला आहे कारण राज्यात कडक उष्णतेने कहर केला आहे.खालील काही जिल्ह्यात जसें कोझिकोड, कन्नूर, पलक्कड, अलप्पुझा, कोट्टायम आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.रविवारी हवामान खात्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी देशाच्या अनेक राज्यात प्रखर असह्य सूर्यप्रकाश असू शकतो.