भरधाव व्हॅनचे ब्रेक फेल, अनेक वाहनांना ठोकरले, 2 जणांचा जागीच मृत्यू, 4 जखमी

भीषण अपघात:

पुणे – पुण्यातील उंड्री चौकात अचानक एका  व्हॅनचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर या व्हॅनने सुमारें ५ ते ६ गाड्यांना जोरदार ठोकरले . या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला  तर ईतर चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

पुण्यातील कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. व्हॅन चे  ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली असल्याची माहिती मिळाली आहे.या  अपघातात एक रिक्षा, टेम्पो, दोन कार, एक दुचाकी, एक चारचाकी वाहनांचा समावेश आहे. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.अपघातातील जखमी असलेले प्रशांत भानुदास घेमुड (वय ३७) व  एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात सापडलेला रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख (रा. हडपसर) हे चौघे गंभीर जखमी झाले. ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.