तिसऱ्या आठवड्यात ही चांगले उत्पन्न
केरला स्टोरी 200 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सोमवारी या चित्रपटाने 4.50 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाचे एकूण ‘कलेक्शन 203.47 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने ऑलटाइम ब्लॉकबस्टरचा किताबही संपादन केला आहे.
शाहरुख खानच्या पठाण नंतर 2023 चा हा दुसरा चित्रपट आहे ज्याने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचे बजेट खूपच कमी आहे, चित्रपट प्रदर्शित होऊन तिसरा आठवडा संपला आहे, तरीही त्याचे कलेक्शन थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. द केरला स्टोरी या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात सुमारे 31 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाकडे लोकांचा कल अजूनही सकारात्मक आहे.
रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात एवढी रक्कम मिळवणे ही एक प्रशंसाच आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्येही चित्रपटावरील बंदी उठवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होताना दिसत आहे.