२५ मे रोजी समर्थ प्रतिष्ठानचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

परळी वैजनाथ – एम एन सी न्यूज नेटवर्क – समर्थ प्रतिष्ठान द्वारा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे प्रतीवर्षा प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत होत असल्याने या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहेच.वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा होणार आहे.यंदाच्या सोहळ्यासाठी २४ बटूंची नोंदणी प्रतिष्ठान कडे करण्यात आली आहे.साधुसंतांची आशिर्वादपर उपस्थिती व शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उपनयन संस्कार सोहळा राज्यभरात प्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ज्या सोळा संस्कारांचा उल्लेख आहे त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे उपनयन संस्कार,प्रतिवर्ष नित्यनेमाने सामुदायिकरीत्या हा सोहळा समर्थ प्रतिष्ठान आयोजीत करत असते.यंदा २५ मे २०२३, मित्ती जेष्ठ शु ०६ शके १९४५ गुरूवार रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनीटांच्या पावन मुहूर्तावर उपनयन संस्कार वैद्यनाथ दर्शन मंडप,परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे.माजलगाव येथील वे.शा.स.ज्योतिषाचार्य अनंत शास्त्री जोशी यांचे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना मिळणार आहे.या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समर्थ प्रतिष्ठान परळी वैजनाथ तर्फे करण्यात आले आहे.
◾याआधी अनेक संत महंतांचे बटूंना लाभले आशिर्वाद
याआधी समर्थ प्रतिष्ठान द्वारा आयोजित केलेल्या उपनयन संस्कार सोहळ्यातील बटूंना आशीर्वाद देण्यासाठी करवीर पीठाचे शंकराचार्य प.पु. विद्यानृसिंह भारती,जगद्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, संकेश्वर पिठाधिश्वर विद्या नरसिंह भारती स्वामीजी,उमरखेड संस्थानचे प.पु. माधवानंद महाराज, बहुसोमयाजी यज्ञमार्तंड यज्ञेश्वर सेलूकर महाराज,ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर, प्रज्ञाचक्षु विद्याभुषण हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर,प.पु. मोहनबुवा रामदासी, विरसणी संस्थानचे पं.पु बापु महाराज विरसणीकर,नाशिक काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीरदास पुजारी, ज्योतिषाचार्य अतुल भगरे गुरूजी, वेदशास्ञ संपन्न घनपाठी शशांक कुलकर्णी, भागवताचार्य सच्चिदानंद शेवडे,बसवकल्याण दत्त संस्थानचे माधवानंद सरस्वती महाराज आदि संत महंतांची उपस्थिती लाभली आहे.