अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने तर 24 मे रोजी  वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू 

दुःखद निधन: 

प्रसिद्ध टीव्ही शो ‘अनुपमा’मध्ये  भूमिका साकारणाऱ्या नितेश पांडेंचे निधन झाले आहे. काल 23 मे रोजी रात्री 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.लेखक सिद्धार्थ नागर यांनी फेसबुकवर अभिनेत्याच्या निधनाची माहिती दिली.

तर 22 मे रोजी साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे मेकर जेडी मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती.
22 मे रोजी वैभवी उपाध्याय  तर 23 मे रोजी नितेश पांडे या दोन टीव्ही अभिनेता आणि अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. टीव्ही अभिनेते नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता तर वैभवी उपाध्याय या अभिनेत्रीच्या जन्म 25 जुलै 1985 रोजी झाला होता.