भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना संधी
औरंगाबाद, दि. 24 (जिमाका):- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतीसाठी दि.26 मे 2023 ते 07 जून 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र.53 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणाची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय औरंगाबाद येथे दिनांक 25 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट www.mhasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन (Other –PCTC Nashik SSB-53) कोर्ससाठी संबंधित या परिशिष्टांची प्रिंट काढून व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन जावे. त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कलयाण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमुद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावेत.
कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलीली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी.मुलाखतीसाठी कॉल सेंटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड , नाशिक यांचा इमेल आय डी training.petcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.आणि 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.