परळीच्या आरती पोरवालने देशात मिळवला 124 वा क्रमांक

नेत्रदीपक यश

परळीच्या आरती पोरवालचे JEE परीक्षेत नेत्रदीपक यश:99.81 टक्के गुण

परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क- दि.24 – अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या  जाणाऱ्या JEE (B Arch) परीक्षेत परळीच्या सुकन्येने घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत 99.81% गुण मिळवत तिने देशपातळीवर 123 वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

परळी वैजनाथ येथील सर्वपरिचित पोरवाल कुटुंबातील कु. आरती सुरेश पोरवाल हिने JEE या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. JEE (B Arch) परिक्षेत 99.81% गुण मिळवत तिने देशपातळीवर 123 वा क्रमांक मिळवला आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कु.आरती पोरवाल हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.