फुलचंद कराडांना वैद्यनाथ कारखान्यावर बिनविरोध संचालक करावे

फुलचंद भाऊंच्या अनुभवाचा कारखान्याला निश्चित फायदा होईल; शेतकरी सभासदांची मागणी

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रीया सुरू असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वस्तरांतून प्रयत्न होत आहेत. निवडणूक बिनविरोध होत असतांना निवडूण जाणाऱ्या सभासदांमध्ये जुने आणि अनुभवी संचालक असावेत अशी शेतकरी सभासदांची मानसिकता आहे. कारखाना आजारी अवस्थेत असतांना अनुभवी संचालकांची नवउभारीसाठी मार्गदर्शक भूमिका महत्वाची ठरू शकते, त्यामुळे १० वर्षे व्हाईस चेअरमन राहिलेल्या फुलचंद कराडांना बिनविरोध संचालक म्हणून घ्यावे अशी आग्रही मागणी शेतकरी सभासदांमधून होत आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेकडो शेतकरी सभासदांची फुलचंद कराड यांना सहानूभूती आहे. स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खांद्याला खांदा लावून फुलचंद कराड यांनी हा साखर कारखाना उभारणीत मोलाची भूमिका बजावलेली आहे. हा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवेल असा मुंडे साहेबांना आत्मविश्वास होता. त्यामुळे तत्कालीन सहकाऱ्यांना घेवून त्यांनी कारखान्यासाठी जीव ओतून काम केले. जागा कारखान्यासाठी शासनाची परवानगी घेण्यापासून ते शेतकरी सभासद करणे आणि कारखाना उभा करण्यापासून तो आशिया खंडात पहिल्या क्रमांकाचा कारखाना घडवण्यापर्यंत लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना फुलचंद कराड यांनी साथ दिली. एवढेच नाही तर त्यांनी स्वतः च्या शाळेची प्रस्तावित जागा वैद्यनाथ कारखान्याच्या उभारणीसाठी मुंडे साहेबांच्या एका शब्दावर दिली.

फुलचंद कराड यांच्यासारखे अनुभवी संचालक आगामी संचालक मंडळात असतील तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा जोमाने उभारी घेवू शकेल असा आत्मविश्वास शेतकरी सभासदांना वाटतो. त्यामुळे राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी फुलचंद कराड यांना येणाऱ्या संचालक मंडळामध्ये समाविष्ठ करून घ्यावे अशी आग्रही मागणी शेतकरी सभासद वर्गातून होत आहे. सभासदांच्या आग्रही मागणीचा पंकजाताईंनी मान ठेवावा व फुलचंद कराडांना बिनविरोध संचालक करावे अशी मागणी देविदास कराड, मारुती राव आंधळे, सायसराव फड, विष्णू केंद्रे, सुदाम मुंडे, अप्पासाहेब मुंडे, राम हरी गित्ते, गोविंद मुंडे, रामराव नागरगोजे, भागवतराव मुंडे, मुरलीधर मुंडे, श्रीराम मुंडे, रवी कराड, भाऊसाहेब मुंडे, महादेव कराड, रमेश कराड, रमेश कराड, प्रशांत भय्या कराड, संभाजी सोळंके, भाऊसाहेब डिघोळे, विठ्ठल नागरगोजे, माऊली फड, भक्तराम कांदे, सहदेव कांदे, राधाकिशन पवार, अशोक दहिफळे, बाबुराव मुंडे, सुरेश मुंडे यांच्यासह शेकडो सभासद यांनी केली आहे.