छत्रपती संभाजीनगर-नाशिक प्रवास आता ३ तासांत, शिर्डी ते भरवीर या मार्गाच्या सुमारें ८० किमीच्या टप्प्यात ७ मोठे पूल,१८ लहान पूल,वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांच्या साठी २३ भुयारी मार्ग, मार्गाच्या ३ टोलनाक्या जवळ इंटरचेंजेस असणार आहेत.
नाशिक-एम एन सी न्यूज नेटवर्क – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ मे रोजी आज दुपारी ३ वा शिर्डी इंटरचेंजेर येथें उद्घाटन होणार आहे. शिर्डीपासून नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंतचा ७९.७७ किमीचा हा टप्पा असेल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय सहसंचालक संजय यादव यांनी माध्यमांना दिली. हा महामार्ग खुला झाल्याने छत्रपती संभाजीनगर ते नाशिक प्रवासही सुखकर होणार आहे.
बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचे गेल्या वर्षी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शिर्डी ते भिवंडी यादरम्यानचा महामार्ग वाहतुकीसाठी केव्हा खुला होणार याची प्रतीक्षा होती.
त्यानुसार आता एमएसआरडीसीने दुसऱ्या टप्यात शिर्डी ते भरवीर हा ७९.७७ हा किमीचा महामार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील शिर्डी येथील ५२०.९५१ इंटरचेंजेर किमी पासून ते भरवीर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील ६००.२१ किमी यादरम्यानचे ७९.७७ किमीचे उद्घाटन होईल. दरम्यान, नाशिक ते नागपूर प्रवासासाठी पूर्वी सुमारे १८ तास लागत होते. आता समृद्धी महामार्गामुळे हे अंतर सुमारे सात तासांवर आले आहे. म्हणजे
१० ते १२ तास वाचतील. नाशिक ते छत्रपती संभाजीनगरसाठी पूर्वी ५ तास लागत होते. आता हे अंतर ३ तासांवर आले आहे …………………………………………..
७०१ पैकी आता ६०० किमीचा मार्ग होणार सुरू नागपूर ते आंबणे (भिवंडी) असा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग आहे.
त्यातील पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हे ५२०.९२१ किमी मार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर २०२२
रोजीच उद्घाटन झाले होते. आता भरवीरपर्यंत ६००.१२८ किमीपर्यंत महामार्ग खुला होणार आहे.