मुंबई समोर 234 धावांचे आव्हान

अहमदाबाद – आयपीएल-16 मधील क्वालिफायर-2 सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला   पावसामुळे टॉसला विलंब झाला. टॉस 7.45 वाजता झाला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा करत मुंबईला विजयासाठी 234 धावांचे आव्हान दिले.

याचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर नेहल वढेरा पहिल्या षटकात 4 धावांवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. तर दुसऱ्या षटकात हार्दिकच्या चेंडूवर कॅमेरून ग्रीन रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर शमीने तिसऱ्या षटकात रोहित शर्मालाही 8 धावांवर आऊट केले. तर सहाव्या षटकात राशिद खानने तिलक वर्माला 43 धावांवर आऊट केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीनने डाव पुढे नेत चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात कॅमेरून ग्रीनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.