27 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत जल वाहतूक बंद

मुंबई :एम एन सी न्यूज नेटवर्क–  गेटवे ते अलिबाग मांडवा ही प्रवाशी जलवाहतूक आज 27 मे पासून  तीनमहिने बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ही प्रवासी वाहतूक बंद राहील. दरम्यानच्या काळात प्रवाशी नागरिकांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागणार आहे . गेटवे ते मांडवा ही वेळेची बचत करणारी महत्व पूर्ण सेवा आहे.

मांडवा ते गेटवे जलवाहतूक बंद होणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यान रो रो बोट सेवा सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांना काहिसा दिलासा मिळेल. मांडवा ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते. अलिबाग हुन रस्ते मार्गे मुंबईत  येण्यासाठी सुमारें चार तासांहून अधिक वेळ लागतो. वाहतूक कोंडी झाली तर हा वेळ अधीक लागतो. मात्र  जलवाहतुकीमुळे अवघ्या तासाभरात मुंबईत पोहोचता येत ते ही समुद्र सफरीचाआनंद घेत.