खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिकेने अर्ध्या वाटेत सोडले, 10 किमी मृतदेह घेऊन पायी चालले आईवडील.
चेन्नई –तामिळनाडूतील वेल्लोरमधील अलेरी गावात 18 महिन्यांची मुलगी आई-वडिलांसोबत घराबाहेर झोपली असताना तिला साप चावला. एका दीड वर्षाच्या मुलीला साप चावला. मुलीच्या पालकांनी आणि नातेवाइकांनी तिला सरकारी रुग्णालयात नेले, मात्र परिसरातील रस्त्यांची दुरवस्था असल्याने त्यांना उशीर झाला. यामुळे मुलीचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
धनुष्का या 18 महिन्यांच्या मुलीच्या पालकांची नावे विजय आणि प्रिया अशी आहेत. पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देऊन रुग्णवाहिकेतून घरी पाठवण्यात आला. परंतु रुग्णवाहिका चालकाने खराब रस्ता पाहून पुढे जाण्यास नकार दिला आणि त्याला गावापासून सुमारे 10 किमी मागे नेले. त्यामुळे पालकांना मृतदेह पायी चालत घरी घेऊन जावा लागला.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत स्टॅलिन यांनी गडकरींना लिहिले होते पत्र
यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चेन्नई ते राणीपेठ (NH-4) जोडणाऱ्या रस्त्याच्या खराब स्थितीबद्दल पत्र लिहिले होते. सीएम स्टॅलिन यांनी दावा केला होता की, रस्त्याची स्थिती इतकी वाईट होती की त्यांना वेल्लोर, रानीपेट, तिरुपत्तूर आणि तिरुवन्नमलाई जिल्ह्यांपर्यंत ट्रेनने जावे लागले.