१ जून रोजी नागरी सहकारी बँकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

◾महाबळेश्वर येथे सहकार भारतीचा उपक्रम

कोल्हापूर  : एम एन सी न्यूज नेटवर्क – सहकार भारती कोल्हापूर विभाग आणि महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी , संचालक , सीईओ व अधिकारी यांच्यासाठी एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे गुरुवार दिनांक १ जून रोजी महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे हा प्रशिक्षण वर्ग होणार आहे प्रशिक्षण ला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून सायंकाळी ५/३० वाजता याचा समारोप होणार आहे.

या प्रशिक्षणा वर्गात श्री अतुल खिरवडकर संचालक इंडियन बँक असोसिएशन यांचे बँकिंग रेगुलेशन ॲक्ट मधील सुधारणांचा बँका वरील परिणाम या विषयावर श्री अविनाश जोशी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य वाई अर्बन बँक यांचे सहकारी बँकांचे व्यवस्थापन व रिझर्व बँकेची बदलती निरीक्षण पद्धती या विषयावर तसेच सी ए अजय ब्रम्हेचा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशन यांचे सहकारी बँकांच्या समस्या व असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे निराकरण या विषयावर तसेच श्री धनंजय सहस्त्रबुद्धे (जनरल मॅनेजर जनता सहकारी बँक पुणे) यांचे SAF नंतरची Activity  या विषयावर चर्चासत्रे होणार आहेत .

यावेळी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . प्रशिक्षण वर्गात कोल्हापूर , सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील बँकांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, संचालक, अधिकारी सहभागी होऊ शकतात. नोंदणी आजच करून या प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे असे नम्र आवाहन सहकार भारती कडून करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी संपर्क- नरेंद्र गांधी 99 22 29 27 67