परळी तालुक्यात मंगळवारी रात्री आढळला तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह

परळी वैजनाथ- एम एन सी न्यूज नेटवर्क– परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारातील रामनगर तांड्याजवळ मंगळवारी रात्री तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस अधीक तपास करत आहेत. सदर मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

मृत इसमाच्या शरीरावर निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, बदामी रंगाचे शर्ट व कमरेला बेल्ट, पायात बुट आहे. त्याच्या हातावर स्नेहा नाव गोंदविलेले आहे. आंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले, परळी ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी नारायण गीते, पोउपनि गणेश झांबरे, हवालदार केकान, पोलिस नाईक नवनाथ हरगावकर, सुनील अन्नमवार, येरडलावार, एकुलवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.