फेसबुक वरून मैत्री, प्रेम आणि संशयावरून मैत्रिणीची अमानुष हत्या

यवतमाळ – फेसबुक वरून झालेल्या मैत्रीतून प्रेम निर्माण झाले गाठीभेटीतून मैत्री वाढली आणि संशयावरून प्रियकराने प्रेयसीच्या केलेल्या निर्घृण खुनाने यवतमाळ जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे या दोघांचे फेसबूकवरून प्रेम जुळले होते. मात्र, नात्यात निर्माण झालेल्या संशयाने घात केला. प्रिया रेवानंद बागेसर ऊर्फ आरोही वानखेडे असे मृत तरुणीचे नाव आहे.

विनोद रंगराव शितोळे असे संशयिताचे नाव असून, त्याला हिंगोली जिल्ह्यातल्या शिरोळी वसमत येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने हलवत त्याला चोवीस तासाच्या आत अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

विनोद आणि प्रिया यांची फेसबूकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात केव्हा बदलली हे समजले नाही. त्यातूनच दोघांच्या गाठी-भेटी होऊ लागल्या. प्रियाला भेटण्यास विनोद वणीला यायचा. प्रियाचे गाव वरोरा. मात्र, ती गेल्या काही दिवसांपासून वणीत एका फ्लॅटमध्ये किरायाने रहात होती. वणी शहरातील जैन ले-आउट भागातील कृष्णा अपार्टमेंटमध्ये प्रिया रहात होती.मात्र या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. मात्र, आतून दुर्गंधी येत होती. हे फ्लॅटमालकाला आजूबाजूस असणाऱ्या नागरिकांच्या द्वारे समजली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा प्रियाचा मृतदेह आढळून आला.

▪️ओळख… फेसबुकवर

विनोद आणि प्रिया यांची फेसबूकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात बदलली आणि त्यातूनच दोघांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी होऊ लागल्या. प्रियाला भेटण्यास विनोद वणीला यायचा. प्रियाचे गाव वरोरा. मात्र, ती गेल्या काही दिवसांपासून वणीत एका फ्लॅटमध्ये किरायाने रहात होती. वणी शहरातील जैन ले-आउट भागातील कृष्णा अपार्टमेंटमध्ये प्रिया रहात होती.मात्र या फ्लॅटचा दरवाजा बाहेरून बंद होता. मात्र, आतून दुर्गंधी येत होती. हे फ्लॅटमालकाला आजूबाजूस असणाऱ्या नागरिकांच्या द्वारे समजली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. तेव्हा प्रियाचा मृतदेह आढळून आला.