मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर सुर्यकांत नेटके, अनिल जाधव यांची निवड

बीड -एम एन सी न्यूज नेटवर्क- राठी पत्रकार परिषदेच्या विभागीय मेळाव्याच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्कारासाठी नगर येथील पत्रकार सूर्यकांत नेटके व अनिल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्या पत्रकारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय अधिवेशनाच्या निमित्ताने यापूर्वीच तीन पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये दिलीप खिस्ती यांना पत्रभुषण, सौ.मनिषा तोकले यांना समाजभूषण तर कल्याण कुलकर्णी यांना कृषिभुषण पुरस्कार जाहीर करण्यात आले.

त्यानंतर बीड येथील रहिवाशी असलेले मात्र सध्या नगर येथे दै.सकाळमध्ये कार्यरत असलेले सुर्यकांत नेटके यांना स्व.सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवागौरव पुरस्कार तसेच बीड येथील दै.राज्यलोकतंत्रचे उपसंपादक अनिल जाधव यांना स्व.प्रभाकरराव कुलकर्णी स्मृती श्रमिक पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार डॉ.विश्वंभर चौधरी, ॲड.असिम सरोदे, परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, आ.संदीपभैय्या क्षीरसागर, आ.नमिताताई मुंदडा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ॲड.माधव जाधव यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम मॉ वैष्णो पॅलेस, एमआयडीसी बीड येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मराठवाड्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे राज्यप्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, डिजिटल मिडियाचे राज्यसमन्वयक अनिल वाघमारे, विभागीय सचिव बालाजी सुर्यवंशी, विभागीय संगठक सुभाष चौरे, प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, सतिश बियाणी, प्रा.राजेंद्र तरकसे, छगनराव मुळे, संजय हांगे, साहस आदोडे, रवि उबाळे, दिलीप झगडे, संजय राणभरे, दिनेश बागवान, चंद्रकांत राजहंस, सय्यद शाकेर, गौतम बचुटे, मधुकर तौर, अविनाश कदम, सचिव पवार, बालकिशन सोनी, गजानन मुडेगावकर, राम शेळके, विनायक जाधव, हरिष यादव आदींनी केले आहे.