◾ राज्यातील मान्सून आठ दिवस लांबण्याच शक्यता
मुंबई-एम एन सी नेटवर्क – साधारणपणे जूनच्या सुरुवातीला अवकाळी किंवा वादळी पावसाची शक्यता असतेच परंतु अध्याप मान्सूनचे आगमन झाले नाही. मात्र बंगालच्या उपसागरात मान्सूनला पूरक वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांत मान्सूनने केलेली प्रगती निश्चितच आनंदाची आहे. मान्सून केरळच्या किनाऱ्यापासून ४०० किमीवर आहे. सध्या मान्सूनचा दक्षिण अरब सागर, मालदीव, कोमोरिन क्षेत्रात आहे. दक्षिण बंगालची खाडी व पूर्व मध्य बंगाल खाडीतही मान्सूनची आगेकूच सुरू आहे. त्याआधारे मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर येऊन धडकेल असा तज्ञाचा अंदाज आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारणपणे : जून च्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे १४-१५ जून रोजी राज्यात मान्सूनच आगमन होऊ शकते.
दक्षिण-मध्य कोकणात सामान्य पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वेळी जून महिन्यात तापमान एक-दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे…
सद्यस्थितीत राज्यात कडकडीत ऊन असलं तरी उष्णता नसल्यामुळे मान्सून दुसऱ्या आठवड्यात राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . जूनच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा वेग वाढून तो कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ईशान्येतील सात राज्यांत दिसेल. हवामानतज्ज्ञ म्हणाले, मान्सूनवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो.