बालासोर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात

दोन एक्स्प्रेस, मालगाडीचा अपघात; घसरलेल्या डब्यांना दुसऱ्या एक्स्प्रेसची धडक, अपघातातील मृत्यूचा निश्चित आकडा अध्यापही ठरवणे अवघड, हजारो जखमी

मालगाडी आणि दोन एक्सप्रेस रेल्वे चा भीषण अपघातातील मृत्यू चा आकडा वाढणार,
यशवंतपुर हावडा आणि कोरोमंडल एक्सप्रेस या शुक्रवारी एकमेकास धडकल्या तर एक्सप्रेसचे डबे रुळावर इस्तस्त पडले होतें त्यांना मालगाडी येऊन धडकली आणि अपघाताची भीषणता आणखीन वाढली.

ओडिशा- बालासोर- जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ बालासोर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस एकमेकांना धडकून ओडिशात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात 200 पेक्षा अधिक ठार, हजारो जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघातात आणखी एका मालगाडीचाही समावेश होता, असे केंद्रीय सचिव प्रदीप जैन यांनी स्पष्ट केले आहे.
बालासोर जिल्ह्यातील बाहनागा बाजार स्थानकाजवळ संध्याकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास
हा अपघात झाला. अपघाताची भीषणता एवढी होती की, त्यानंतर परिसरात एकच हलकल्लोळ झाला. मदतकार्यासाठी ६० अॅम्ब्युलन्स आणि एनडीआरएफचे २२ जणांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ३२ जणांचे आणखी एक पथक कटक येथून बालासोरला जात सल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, स्थानिक मदत पथकाने स्थानिकांच्या मदतीने
रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले, तर जखमींना तत्काळ जवळच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोरोमंडल एक्स्प्रेस क्र. १२८४१ शालिमार स्थानकाहून चेन्नई मध्यवर्ती स्थानकाच्या दिशेने धावत होती. तर बेंगळुरूहून हावडाकडे जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा दुरांतो एक्स्प्रेस (१२८६४) एक्स्प्रेसला अपघात झाला.या अपघातात एक्स्प्रेसचे ८ ते १० डबे रुळावरून घसरले.सुरुवातीला हा अपघात एक्स्प्रेस गाडी मालगाडीला धडकल्याने
झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळले.
या भयानक रेल्वे अपघातातील मृत्यूचा निश्चित आकडा अध्यापही ठरवणे अवघड आहे अनेक जखमी मृत्यूची झुंज देत आहेत.

………………………………………………………………………………………………………….

देशात घडलेले भीषण रेल्वे अपघात व अपघातातील मृत्यू

१९८१ : बिहारमध्ये एक पॅसेंजर ट्रेन रुळावरुन घसरून तिचे डबे बागमती नदीत कोसळून ५०० प्रवासी ठार.

१९९५ : पुरुषोत्तम एक्स्प्रेस फिरोजाबाद येथे कालिंदी एक्स्प्रेसवर धडकून ३५८ प्रवासी मरण पावले.

१९९८ : जम्मू तावी-सील्दा एक्स. व गोल्डन टेम्पल मेल धडकेत २१२ ठार.

१९९९ : आसामजवळील गॅसल येथे २ रेल्वेगाड्यांची धडक, २९० ठार.

२००२ : राजधानी एक्स्प्रेस रफिगंज येथे घसरून १४० ठार.

२००५ : वालिगोंडा येथे रेल्वे पूल वाहून गेल्याने त्यावरून जाणारी डेल्टा फास्ट पॅसेंजरमधील ११४ ठार.

२०१० : उत्तर बंग एक्स्प्रेस व वनांचल एक्स्प्रेसमध्ये पश्चिम बंगालमध्ये जोरदार धडक, ६३ ठार.

२०१० : ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस पश्चिम बंगालमध्ये एका स्फोटामुळे रुळांवरून घसरून तिची एका मालगाडीशी टक्कर, १७० ठार.

२०१२ : आंध्र प्रदेशमध्ये हुबळी- बंगलोर हम्पी एक्स्प्रेस एका मालगाडीला धडकून अपघातात २५ प्रवासी मरण पावले.

२०१६ : इंदूर-पाटणा एक्स्प्रेस ही कानपूर जवळील पुखरायणनजीक रुळांवरून घसरली.१५० प्रवासी ठार तर १५० जखमी.