वाल्मिक अण्णा कराड यांची निवड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सत्कार

परळी वैजनाथ -एम एन सी न्यूज नेटवर्क :- वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक अण्णा कराड यांची बिनविरोध निवड झाल्याबदल राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदी वाल्मिक अण्णा कराड यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल जगमिञ कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद कराड,संदीपराजे दिवटे, युवक उपाध्यक्ष अभि गित्ते, गणेश सुरवसे, अभिजित धाकपाडे, सचिन कराड,पंकज भोसले, आकाश रोडे ,रखमाजी ढाकणे, युवक संघटक मोईन भाई काकर, बिलाल पलंबर ,अतुल मुंडे,युवक विद्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषी राठोड, कार्यकाणी सदस्य बालाजी गुट्टे, लिंबाजी दहिफळे, रानबा ढाकणे, उमेश गित्ते, गजेंद्र मगर आदी उपस्थित होते.