मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं आज होणार लोकार्पण रद्द

मुंबई, : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं आज 3 जून रोजी होणारा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज सकाळी 10.30 वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नवी दिल्लीच्या कार्यालयातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहणार होते.

पण ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव ओडिशा राज्यातील रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी जात आहेत.

ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाता अनेकांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर सुमारें 900 पेक्षा अधीक प्रवाशी जखमी झालेले आहेत.