पोलीस अधीक्षक ठाकूर आणि मुख्य अभियंता भदाणे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार
परळी-प्रतिनिधी एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा विभागचे राजेंद्र बाबुराव पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संच ६ चे किशन संभाजी शिंदे व राख हाताळणी विभागातील भागवत लक्ष्मण डोंगरे या तिघांची दि. ३१ मे २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात सेवापूर्ती कार्यक्रमात निरोप देण्यात आला. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे आणि बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे हे होते तर प्रमुख पाहुणे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची उपस्थिती विशेष होती. या प्रसंगी परळी औष्णिक विद्युत केंद्रात कर्तव्य बजावलेले वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा विभागातील राजेंद्र बाबुराव पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशन संभाजी शिंदे व राख हाताळणी विभागातील भागवत लक्ष्मण डोंगरे यांचा सेवापूर्ती निमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांची केलेल्या कार्याला गौरव करण्यात आला. या प्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी भावुक झाले.
या वेळी कार्यक्रमास अधीक्षक अभियंता एस.एन.बुकतारे, अधीक्षक अभियंता राजीव रेड्डी, अधीक्षक अभियंता पी. बी. गरुड,वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे, धनंजय कोकाटे, एस बी उदार,बाबा राठोड, सचिन पवार, साईनाथ रामोड अरुण गीते, बालाजी कांदे, परमेश्वर सरवदे आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन के एच गित्ते मॅडम तर आभार महेंद्र शिंदे यांनी मानले.