परळी वैजनाथ,दिनांक ०३। एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी सह राज्यभरात अनेक ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमीत्त गोपीनाथ गडावर रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची किर्तनसेवा झाली. तर परळी शहरात ठीक ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले.
आज आंबेवेस मित्र मंडळ तर्फे अंबेवेस येते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळेस मुंडे साहेब अमर रहे वापस या वापस या मुंडे साहेब वापस या या घोषणा देण्यात आल्या यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर , वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रकाश जोशी ,भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव ईटके, बूथ प्रमुख सुशील हरंगुळे , विकास हालगे पावन तोडकरी राजकुमार कौलवार बंडू चौंडे संदीप चौंडे गजूभाऊ चौंडे नरेश पिंपळे गणेश फुलारी शिवदास आप्पा सोनवणे पाठक काका, बबन शिवगण, बाळू आर्वीकर, खाजाभाई थळकरी, राजाभाऊ कौलवार, अमोल पांडे, जिया खान, पुराणिक भगवान, कापसे, शरद कावरे, शिवजी घवले, पदमा दाडगे, गणेश फुलारी, विशाल पुराणिक, प्रकाश खोत सह भागातील नागरिक उपस्थित होते.
