बालासोर रेल्वे दुर्घटना स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,

बचाव कार्या चा आढावा आणि जखमीची केली विचारपूस

ओडिशा- राज्यातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदी नी घटनास्थळी भेट देऊन सद्यस्थितीत होत असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या
प्रकृती विषयी माहिती जाणून घेत आणि त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेत जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. या रेल्वे अपघातात आतापर्यंत 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘हा एक अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा अपघात आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, देव सर्वांना बळ देवो जेणेकरून ते या दुःखद प्रसंगावर मात करू शकतील.’

पीएम मोदींचा संबंधित विभागाच्या मंत्र्यांना घटनास्थळावरून फोनद्वारे सूचना

  • अपघातस्थळी ठिकाणी पीएम मोदींनी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळावरून पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली सुविधा मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे.