९४ व्या वर्षी सुलोचना दीदी यांनी घेतला अखेरचा श्वास.

मुंबई – 4 जून : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन झाले. वयाच्या ९४ वर्षी सुलोचना दीदी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मराठी मातीतील शालीनता, घरंदाज अभिनय आणि सोज्वळतेचा चेहरा म्हणजे सुलोचना दीदी होया. सुलोचना दीदींचं मूळ नाव सुलोचना लाटकर.

सुलोचना दीदी यांची शनिवारी प्रकृती चिंताजनक बनली होती. रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.  महिन्यातही त्यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हा श्वास घेण्यात अडचण येत होती.

सुलोचना दीदी यांनी 250 हून अधिक मराठी चित्रपटातून काम केलं. असून  प्रमुख अभिनेत्रीसह सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसल्या होत्या. ४० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी पाऊल टाकलं होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं. कोल्हापूरमधल्या खडकलाट गावी सुलोचना दीदींचा जन्म झाला. 250 हून अधिक मराठी आणि 150 हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.